(Positive) नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या एका अंकावर 

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 850 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. ही नांदेडकरांसाठी सकारात्मक बातमी असून , आता संपूर्ण नांदेड जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने जात आहे. (Positive : Number of corona patients in Nanded district at one digit)

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 212 एवढी झाली असून यातील 88 हजार 548 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 171 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, लोहा तालुक्यांतर्गत 1, उमरी 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1 , असे एकूण 8 बाधित आढळले. जिल्ह्यातील 21 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1, किनवट कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 13 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज 171 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 27, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 3, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 63, खाजगी रुग्णालय 10 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Positive: Number of corona patients in Nanded district at one digit)

Local ad 1