...

पॉझिटिव्ह बातमी : मुखेड तालुक्यातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात मिळणार ‘ही’ सुविधा

Positive newsनांदेड (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील आरोग्य सेवा दर्जेदार देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यक साधनसामुग्रीचा समावेश करण्यात आला आहे. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयासह राज्यातील 38 रुग्णालयात डायलिसिस युनिट बसणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला 9 कोटी 91 लाख 50 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुखेड तालुक्यातील ज्या रुग्णांना डायलिसिससाठी (Dialysis unit) नांदेडला ज्याण्याची गरज भासणार नाही. (Positive news: Patients from Mukhed taluka will get to the sub-district hospital)

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर आणि महाग झालेले उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातच दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा मानस आरोग्य विभागाचा आहे. राज्यातील आरोग्य सेवेसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये 35 डायलिसिस युनिट आणि सद्या कार्यरत 3 युनिटकरिता 109 डायलिसिस मशीन, 25 आर ओ प्लॅन्ट आणि इतर साहित्य खरेदीसाठी 9 कोटी 91 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. (Positive news: Patients from Mukhed taluka will get to the sub-district hospital)

 

मोठी बातमी : भीमराव क्षीरसागर यांनी हाती घेतल भाजपचं कमळ

प्रशासकीय मान्यतेसाठी अटी व शर्ती

सदरहू उपकरणे व सामुग्रीची आवश्यकता/मागणी याची शहानिशा / खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच सदर बाबींच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच, सदर प्रक्रिया में.. हाफकीन बायो-फार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन लि. परेल, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात यावी.

 

२) सदरहू उपकरणे व सामुग्रीचे विनिर्देश गरजेनुसार व अद्ययावत असल्याची खातरजमा करण्यात यावी. खरेदी करावयाच्या बाबींचे तांत्रिक विनिर्देश (Technical specification) संबंधित तज्ञांनी (तांत्रिक समिती / अधिकारी) मान्य केलेल्या विनिर्देशानुसार असावेत. तसेच, सदर तांत्रिक विनिर्देश (Technical specification) हे कोणत्याही विशिष्ट कंपनीला फायदा होईल अशा रितीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच या बाबींची खरेदी करण्यात यावी. (Positive news: Patients from Mukhed taluka will get to the sub-district hospital)

३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक: भांखस-२०१४/प्र.क्र. ८२/भाग II/उद्योग-४, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारीत नियमपुस्तिका यामधील तरतूदीनुसार विहित खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी.

 

४) प्रशासकीय मान्यता देताना प्रस्तावित खरेदीचे दर हे अंदाजित आहेत. त्यामुळे GEM Portal, इतर राज्यांचे दरकरार लक्षात घेऊन खरेदी प्रक्रियेअंती दर निश्चित करण्यात यावा. सदर दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाबत आणि संबंधित पुरवठादाराने या बाबीचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या दरापेक्षा जास्त नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.

 

५) खरेदी करण्यात येणाऱ्या बाबींची पुरवठापूर्व/पुरवठानंतर नमुना तपासणी (Pre/Post dispatch random sample inspection) करुन उचित व योग्य विनिर्देश (specification) असलेल्या वस्तुंचीच खरेदी करण्यात येईल, याची खात्री करण्यात यावी.

 

६) सदरहू बाबीसाठी होणारा खर्च सन २०२१-२२ च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये FMR code ६.१.१.२४.१ Procurement of Dialysis Machine अंतर्गत जिल्हयांच्या प्राप्त मागणीनुसार डायलिसीस मशीन, आर.ओ. प्लान्ट आणि इतर उपकरणाच्या खरेदीसाठी मंजूर करण्यात आलेल्या रुपये ९९१.५० लक्ष रुपये नऊ कोटी एक्यान्नव लक्ष पन्नास हजार फक्त) इतक्या अनुदानातून भागविण्यात यावा.

Local ad 1