संघर्षयोद्धा मनोज जरंगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा : विजय डाकले

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कोथरुडमधील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांची संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत दलित, मातंग व मराठा समाज बाबत सकारामक चर्चा झाली व सर्व एकत्र येवून क्रांती होणार असल्याचे विजय डाकले यांनी सांगितले आहे. (Positive discussion with Sangharsh Yoddha Manoj Jarange : Vijay Dakle)

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ । पुणे जिल्ह्यातील 109 उमेदवार छाननीमध्ये निवडणुकी बाहेर 

 

आज अंतरवाली सराटी येथे डाकले यांनी जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणूकी संदर्भात भेट घेतली. त्यावेळी सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षण व दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आम्ही त्यांची भूमिका मान्य केली आहे. त्यामुळे अनेक विषयाबाबत सकारामत्क भूमिका त्यांनी मांडली आहे.

 

पर्वती विधानसभा मतदार संघात समान नावाचे चार उमेदवार

सर्व समाजाला सोबत घेऊन या निवडणुकीत महत्वाची भूमिका घेणार असल्याचे मनोज दादांनी सांगितले. तसेच येत्या १ तारखेला निवडणूक लढण्यसंदर्भातला निर्णय मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत. यावेळी कोथरूडच्या जागेसंदर्भार्त देखील सकारात्मक चर्चा झाली आहे. मला कोथरुडमध्ये पाठिंबा मिळणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे विजय डाकले यांनी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रात येत्या काळात जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात फार मोठी क्रांती घडणार असल्याचे डाकले यांनी सांगितले.

Local ad 1