नांदेड : शहरातील लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Positive discussion of Police Commissionerate started)
नांदेड जिल्ह्यात आज घडीला 36 पोलीस स्टेशन आहेत तर महानगरामध्ये 12-14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा (Nanded District) आणि महानगरातील पोलीस स्टेशनची संख्या लक्षात घेऊन नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (State Home Minister Dilip Walse-Patil) यांनी सांगितले. (Positive discussion of Police Commissionerate started)
Related Posts
नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृहविभागाच्या बैठक घेतला. अधिकार्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Biyani) यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. आरोपी विरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (Positive discussion of Police Commissionerate started)