(Politics) नांदेडमध्ये राजकीय भूकंप : आमदर श्यामसुंदर शिंदे यांचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश

नांदेड (वि्शेष प्रतिनिधी)  : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीने  पक्षबांधणीकडे आपला मोर्चा वळवला आहे. राष्ट्रवादीत नांदेड जिल्ह्यातील एका विद्यमान आमदार प्रवेश करणार असल्याने खळबळ उडाली आहे.  Currently, many dramatic developments are taking place in the politics of the state. The NCP has turned its attention to party building. The existing MLAs from Nanded district will join the NCP.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नुकतेच मराठवाड्याच्या दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी नांदेड जिल्ह्यात भेटी दिल्या त्यात प्रशासकीय बैठका घेत त्यांनी राजकीय मोर्चेबांधणीकडे लक्ष देत भेटी-गाठी घेतल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी नवा अ‍ॅक्शन प्लॅन घेऊन राज्यात जयंत पाटील फिरत आहेत.  नांदेड दौर्‍यात जयंत पाटील यांनी शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबरच राजकीय (politics of the state) खलबतं ही केली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. चहापानाच्या बैठकीत राजकीय डावपेच आखले गेले. जयंत पाटलांच्या भेटीनंतर शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.


आमदार श्यामसुंदर शिंदे यांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची काम करण्याची पध्दत आपल्याला आवडते. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपल्याला मदत करतील ही खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या सत्तेत असणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या मतदारासंघाची विकासकामं वेगाने व्हावीत यासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याची घोषणा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी 27 रोजी माध्यमांशी बोलताना केली. (politics of the state)

Local ad 1