(Political reservation) लोणावळ्यातील ओबीसी चिंतन शिबिराच्या आयोजकांना पोलिसाची नोटीस

पुणे ः राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या चिंतन शिबीरचे आयोजक ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांना लोणावळा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर (Political reservation) आज आणि उद्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील सर्वच पक्षांचे ओबीसी नेते उपस्थित रहाणार आहेत. 

Lonavla police has issued a notice to OBC leader Balasaheb Sanap, the organizer of the Chintan Shibir of prominent OBC leaders in the state. A two-day meditation camp has been organized today and tomorrow on the political reservation of OBCs. It will be attended by OBC leaders from all parties in the state.

ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन आणि मंथन करण्यासाठी 26 आणि 27 जून रोजी ओबीसी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती.  

An OBC meditation camp has been organized on June 26 and 27 to consider the questions of OBCs, OBC Minister Vijay Waddetivar said at a press conference.

Political reservation
Political reservation

मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती या शिबिराला राहणार आहे. या दोन दिवसीय शिबिरात राज्यभरातून 300 कार्यकर्ते सहभागी होणार असून चार सत्रात ते चालणार आहे. 

Minister Chhagan Bhujbal, Congress state president Nana Patole, BJP leader Pankaja Munde, former minister Chandrasekhar Bavankule will participate in the meditation camp. The two-day camp will be attended by 300 activists from across the state and will run in four sessions.

लोणावळा पोलिसांनी आयोजकांना पाठविलेल्या नोटीसीत कोरोनाच्या प्रादुर्बामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यात आपल्या कार्यक्रमात 300 जण सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीस देण्यात आला आहेे.  (Political reservation)

The Corona eruption led to a ban on all public events. About 300 people are expected to attend the event. Corona infection is feared, as large numbers of people are coming together. The Lonavla police has issued a notice to Sanap, who will take legal action against him in case of corona infection or law and order issues.

Local ad 1