...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात अकरा पोलिस निलंबित

पिंपरी : राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शनिवारी चिंचवडमध्ये शाईफेक फेकण्यात आली होती. आता या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी बंदोबस्तावर तैनात असलेल्या अकरा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित (Police Suspended) केले आहे. त्यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Police Suspended in Shahifek Case Against Minister Chandrakant Patil)

 

 

 

पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, आता या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबित करण्यात आले. (Police Suspended in Shahifek Case Against Minister Chandrakant Patil)

 

 

पिंपरी चिंचवडमध्ये  चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पडले आहेत. या घटनेनंतर आठ पोलिस कर्मचारी आणि तीन अधिकारी निलंबित करण्यात आल आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकाराला ही ताब्यात घेण्यात आले आहे.  (Police Suspended in Shahifek Case Against Minister Chandrakant Patil)

 

 

शाईफेक झाल्यानंतर मंत्री चद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी पाटील यांनी या घटनेचा निषेध केला होता. महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिले होते. तसेच, ही लोकशाही नाही. या घटनेप्रकरणी पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांवर निलंबनाची कारवाई करु नका, यामध्ये त्यांची काहीही चूक नाही, अशी विनंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही अखेर 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.

 

काय आहे प्रकरण

भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून विरोध केला जात आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Police Suspended in Shahifek Case Against Minister Chandrakant Patil)
Local ad 1