Police Patil Bharti 2024 । पोलिस पाटील पदासाठी अर्ज कोण करु शकतो?, कर्तव्य आणि मानधन किती मिळतो ?

Police Patil Bharti 2024 । नांदेड : जिल्ह्यात रिक्त असलेल्या 829 पोलिस पाटील पदांचे आरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आती रिक्त असलेल्या जागी पोलिस पाटील पदाची भरती होणार (Police Patil Recruitment) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Police Patil Bharti 2024 । नांदेड : जिल्ह्यात रिक्त असलेल्या 829 पोलिस पाटील पदांचे आरण जाहीर करण्यात आले आहे. (Police Patil Bharti  2024) त्यामुळे आती रिक्त असलेल्या जागी पोलिस पाटील पदाची भरती होणार (Police Patil Recruitment) असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आता पोलिस पदासाठी कोण पात्र ठरु शकतो, त्याची पात्रता काय असते. तसेच नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे कर्तव्य आणि त्यांना मिळणारे मानधन किती मिळतो, हे जाणून घेऊया.. (Who can apply for the post of Police Patil ? How much is the duty and salary?)

 

 

पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाकडून नियुक्त केले जाते. गावातील भांडणे ,शांतता राखण्यासाठी तसेच योग्य वेळी पोलीस मदतीसाठी गावातील पोलीस पाटलांचे सहाय् घेतले जाते. पोलीस पाटील हा शासकीय आणि पोलीस यंत्रणेतील दुवा मानला जाते.

 

पोलीस पाटील होण्यासाठी लागणारी पात्रता Eligibility to become a Police Patil पोलीस पाटील होण्यासाठी हे वयाची मर्यादा 25 ते 45 म्हणजे उमेदवाराचे वय हे 25 पेक्षा कमी नसावे तसेच 40 पेक्षा जास्त नसावे. पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा त्या गावातीलच असावा. स्थानिक व कायम रहिवाशी असावा व ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असायला पाहिजे. उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे कुटुंब लहान असायला हवे व महाराष्ट्र राज्य सेवा नियम 2005 मधील लहान कुटुंबाची पात्रता आवश्यक आहे. तसेच त्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नसावीत. जर उमेदवार हा मागास वर्ग प्रवर्गातील असेल तर आरक्षित पदाकरिता सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असायला हवे. इतर मागासवर्ग विशेष मागास वर्ग व इतर प्रवर्गातील अर्जदार यांना कालावधीकरिता असलेली उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती गट नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील. पोलीस पाटील होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हे फक्त दहावी पास असले पाहिजे. तरच उमेदवार अर्ज करू शकतो.

 

पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असते व प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असतो. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांची असते. तसेच अभ्यासक्रम हा इयत्ता दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो. तसेच सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे कर्तव्य व अधिकार, त्या परिसरातील माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असतो. पोलीस पाटील परीक्षा पास होण्यासाठी उमेदवाराला 80 गुणांपैकी किमान 36 गुण म्हणजे 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. एवढे गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे तोंडी परीक्षा घेण्यात येईल. ही तोंडी परीक्षा 20 गुणांची असते.

 

पोलीस पाटील (Police Patil) हा गावातील पोलीस विभागाचा महत्त्वपूर्ण घटक असतो. जर एखाद्या वेळेस गावामध्ये खून, दरोडा आकस्मिक मृत्यू, किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न? किंवा इतर बाबी घडल्यास पोलीस पाटील ही माहिती पोलीस स्टेशनला कळवतो. पोलीस पाटील हे महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांना संपर्क करून गावातील विविध समस्या सोडवित असतात. त्याच प्रमाणे गावात अनोळखी संशयास्पद व्यक्ती आल्यास त्याची माहिती पोलीस पाटील हा पोलीस विभागाला देतात.असतो. एकंदरीतच पोलीस पाटील (Police Patil Information Marathi) हा पोलीस विभाग व प्रशासकीय विभाग यांच्या मधील दुवा असतो.  आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 ला झाली, त्यानंतर १९६७ ला ‘महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम’ अमलात आला, व तेव्हा पासूनच पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा प्राप्त झाला. एका खेडे गावात एक किंवा त्यापेक्षा जास्त पोलीस पाटलांची नेमणूक केल्या जाऊ शकते. पोलीस पाटील यांच्या मदतीला गावातील कोतवाल असतो. (Police Patil In Marathi)

 

पोलीस पाटील बनण्यासाठी पात्रता

ज्यांना पोलीस पाटील police patil बनायचे असेल तो उमेदवार किमान दहावी पास (10th) असावा लागतो. तो उमेदवार हा 25 ते 45 या वयोगटातील असावा लागतो. कोणताही गुन्हा नोंद नसावा. त्याच प्रमाणे चारित्र्य हे चांगले असावे लागते. उमेदवार हा ज्या गावचा रहिवासी आहे, त्याच गावाकरिता तो पोलीस पाटील म्हणून नियुक्त होऊ शकतो. अभ्यासक्रम आणि परीक्षा पोलीस पाटील (Police Patil) पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाते.  ही परीक्षा 80 गुणांची असून, 20 गुणांची मुलाखत असते. लेखी परिक्षेसाठी 90 मिनिटे इतका वेळ दिला जातो. प्रश्न पत्रिका ही दहावी बेस वर असते. स्थानिक माहिती, सामान्य ज्ञान, सामान्य गणित, इंग्रजी अशा प्रकारचे प्रश्न असतात. ही परीक्षा पास झाल्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाते. police patil information in marathi)

 

 

  पोलीस पाटील यांना मानधन किती मिळतो?

पोलीस पाटील (police patil information in marathi) यांना दर महिन्याला पाच हजार रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

 

Local ad 1