Police Patil Bharti 2024 । पोलीस पाटील पदाला शासनाने मान्यता कधी दिली ? When was the post of Police Pail approved?
Police Patil Bharti 2024 । नांदेड जिल्ह्यात 829 पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, ते लवकरच भरली जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच गावनिहाय आरक्षण ही जाहीर करण्यात आले. पोलिस पाटील (Police Patil Bharti ) पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीतून जावे लागणार आहे.
Police Patil Bharti 2024 । नांदेड जिल्ह्यात 829 पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, ते लवकरच भरली जाणार आहेत. (Police Patil Bharti 2024) त्यासाठी नुकतेच गावनिहाय आरक्षण ही जाहीर करण्यात आले. पोलिस पाटील (Police Patil Bharti ) पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीतून जावे लागणार आहे. (When was the post of Police Patil approved?)
त्यामुळे पोलिस पाटील पद कधी अस्तित्वात आले?, त्यांचे कर्तव्य काय आहेत ? , मानधन किती मिळते ? , निवड कशी होते ?, अशी अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाली असतील. त्यामुळे mhtimes.in च्या माध्यमातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अपेक्षा आहे, तुम्हांला आम्ही देत असलेली माहिती उपयोगाला येईल. (When was the post of Police Patil approved?)
पोलिस पाटील पदाला मान्यता कधी मिळाली ? When was the post of Police Patil approved?
राज्य शासनाच्या महसूल आणि पोलिस विभागाला वेळोवेळी मदतीसाठी प्रत्येक गावात एक विश्वासू व्यक्ती हवा होता. त्यामुळेच 17 डिसेंबर 1967 (Maharashtra Village Police Act, 1967) रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
कोणत्या नियमानुसार पाटील पदाची निर्मिती ? Creation of the post of Patil according to which rules?
ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव पातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी पोलिस पाटलांना शेतसारा वसूल करणे, सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करणे, गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पोलिस पाटलांवर सोपविण्यात आले.
ब्रिटश काळातील वंशपरंपरा रद्द
इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेखीचे काम पाटील यांच्याकडेच होते. ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 (Bombay Village Police Act 1867) अंमलात आणला गेला, त्या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद परंपरेने पुढे आले. मात्र, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागत पदे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1962 पासून रद्द करण्यात आली.
पोलिस पाटील कोणाच्या आदेशाने काम करतात ? Police Patil works under whose order ?
17 डिसेंबर 1967 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रत्येक महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 (Maharashtra Village Police Act, 1967) अधिनियम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये काम करतात.
पोलिस पाटलांची काय आहेत कर्तव्य ? What are the duties of Police Patil?
तालुका कार्यकारी दंडाधिकारी गावातील जी माहिती मागवतील ती पुरवणे, गावातील गुन्ह्यांचे प्रमाण व समाज स्वास्थाची माहिती कळवणे, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना वेळोवळी देणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे. गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.
गावातील घडामोडींवर असते पाटलांचे लक्ष
गावातील सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहीती उपलब्ध करून देत असतो.