नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांना पोलिसाचा दणका

नांदेड : महाराष्ट्र आणि तेलंगणा (Maharashtra and Telangana) या दोन राज्यांच्या सिमेवर असलेल्या मांजरा नदीच्या पात्रतातून (Manjara river)  बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. अवैध रेती उपसा थांबवण्याचे काम महसूल विभागाचे असून, स्थानिक अधिकाऱ्यांच्या अशिर्वादाने वाळू उपसा केला जात आहे. याठिकाणी बिलोली उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (Assistant Superintendent of Police Archit Chandak) यांनी मांजरा नदी पात्रात छापा टाकून  38 वाहने आणि पाच पोकलेन असे कोट्यवधी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर वाहन चालक, ठेकेदारांनी धुम ठोकलो. (Police cracks down on sand mafias in Nanded district)

 

 

 

तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर मांजरा नदीच्या पात्रातून महसुल विभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त जास्तीचा वाळू उपसा केला जात आहे. मांजरा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे महसुल प्रशासन व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्याचे महसूल प्रशासन परवानगी देत असते. परंतु आपण दिलेल्या परवानगीशिवाय, रेती घाटावर योग्य देखरेख ठेवणे ही महसूल प्रशासनाचीच जबाबदारी असते. मात्र, दोन्ही राज्यातील महसुल प्रशासन याकडे अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. (Police cracks down on sand mafias in Nanded district)

 

Police cracks down on sand mafias in Nanded district

 

 

सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांजरा नदीपात्रात धाड टाकली. अचानकपणे पोलिसांनी सुरू केलेल्या या धाडसत्राने मांजरा नदी पात्रात अवैध रेती उपसा करणारे रेती माफियांना मात्र पळता भुई थोडी झालीय. रेती उपसा करणारी वाहने जागेवरच ठेऊन रेती माफियांनी मात्र पळ काढला. अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणावरुन वाळूने भरलेले 38 टिपर आणि 5 वाळू उपसा करणारे पोकलेन असे करोडो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.  (Police cracks down on sand mafias in Nanded district)

Local ad 1