राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी केली अटक  

Police arrested NCP leader Jitendra Awad : ठाण्यातील मॉलमध्ये “हर हर महादेव” चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या राडा प्रकरणी ठाण्यातील वर्तक पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वर्तक पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. सध्या पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे. (Police arrested NCP leader Jitendra Awad)

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक (Jitendra Ahwad Arrested ) केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. (Police arrested NCP leader Jitendra Awad)

 

 

सोशल मीडियावर आव्हाडांनी दिली माहिती…

“आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही”, असे आव्हाड यांनी फेसबुकवर स्पष्ट केले आहे. (Police arrested NCP leader Jitendra Awad)

Local ad 1