89 मुलींना अन्नातून विषबाधा : सात मुलींवर ससुनमध्ये उपचार सुरू
पुणे : भोर तालुक्यातील खोपी येथील फ्लोरा इन्स्ट्युटच्या आवारातील नवगुरुकुल कॅम्पसमध्ये शिक्षण घेत असलेल्या 89 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Poisoning of 89 girls; Admitted to Sassoon for seven girls treatments)
याबाबत सविस्तर असे की, पुण्याच्या भोर तालुक्यातील खोपी येथे असलेल्या प्लोरा इन्स्टिटय़ूट परिसरातील नवगुरूकुल पुणे कॅम्पसमध्ये मुलींसाठी संगणकाचा एक वर्षाचा निवासी प्रशिक्षण वर्ग सुरु आहे. (One year residential computer training course) त्यामध्ये 202 मुली प्रशिक्षण घेत असून, त्यातील तब्बल 89 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आठ मुलींवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर सात मुलींवर ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत, अशी माहिती भोर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Poisoning of 89 girls; Admitted to Sassoon for seven treatments)
पुण्यातील भोर तालुक्यातील खोपी येथील फ्लोरा इन्स्ट्युटच्या आवारात असलेल्या नवगुरुकुल कॅम्पसमध्ये मुलींसाठी निवासी प्रशिक्षण वर्ग चालवले जाते. त्यामध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी 202 मुली असून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी केलेली आहे.
भोर तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर केलेल्या अहवालानुसार रविवारी (26 डिसेंबर) रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी, पुरी आणि भात असे जेवण मुलींना देण्यात आले होते. परंतु सोमवारी रात्री काही मुलींना पोटदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या मुलांना उपचारासाठी खेड शिवापूर येथील श्र्लोक हाॅस्पीटलमधील बाह्य रुग्ण विभागात उपचार घेण्यात आले. (Poisoning of 89 girls ; Admitted to Sassoon for seven treatments)
कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्रिसूत्रीवर भर द्या : आदित्य ठाकरे
मंगळवारी एकूण 89 मुलींना पोटदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याने त्यातील 24 मुलींना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता त्यातील आठ मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सात मुलींना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. तसेच उर्वरित 58 मुलींवर गुरुकुलमध्ये उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Poisoning of 89 girls; Admitted to Sassoon for seven treatments)