Related Posts
पुणे महापालिका हददीत एकुण मिळकतीची संख्या १४ लाख २२ हजार आहे. आता पर्यत ९ लाख १६ हजार २८० मिळकतधारकांनी १ कोटी ६५९ कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे. त्यात ऑनलाईनदारे ९९० कोटीचा मिळकत कर जमा झालेला आहे. धनादेशादारे ४८२ कोटी तर रोख स्वरूपात १८६ कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे, असे पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
पुणे महापालिका लगत असलेली 34 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. त्यातील उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्यात आली आहेत. तर उर्वरित 32 गावे कायम ठेवली. मात्र, गावे समाविष्ट झाल्यापासून पुणे महापालिकेने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाहीत. मात्र, मिळकत कर वसुली सुुरू केली आहे. त्याला नागरिकांनी विरोध केला आहे. मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून, ती परवडणारी नाही, असे सांगत गाव विकायचे आहे, असे आंदोलन सुरु केले आहे. करामध्ये सुधारणा करा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा हवेली तालुका बचाव कृती समितीने दिला आहे. (Pune Municipal Property Tax generated income of 1 thousand 659 crores)
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.