दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे पाय खोलात ; महापालिकेने बजावली नोटीस
२४ तासाच्या आत वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा डॉक्टरांचा खुलासा सादर करावा
पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गर्भवती महिलेचा उपचारा अभावी मृत्यू झाला. त्यात या रूग्णालयाने नियमाचे पालन करण्यात कसूर केलेली आहे. दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९च्या तरतुदीचे उल्लंघन या रूग्णालयाने केलेले आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आणि संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह सादर करावा अशा आशयाची नोटीस पुणे महापालिकेने या रूग्णालयाला दिली आहे. (Pmc issues notice to Deenanath Mangeshkar Hospital)
Related Posts
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याचे आरोप केले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला नोटीस पाठवली आहे.
या नोटीशीमध्ये महाराष्ट राज्य सरकारने १४ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या अधिसुचनेतील नियम ११ (जे) मधील अनु क्रं. १. ते ३ पालन करण्यास कसुर झालेचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ (The Bombay Nursing Home Registration Act 1949) व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२२ मधील तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करण्यात यावा असे नोटीशीत नमूद केले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे (Pune Municipal Corporation Health Officer Dr. Nina Borade), सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी ही नोटीस बजाविली आहे.