पुणे महापालिकेने पीएमआरडीएला पाठवली 13 लाखांच्या दंडाची नोटीस

टाटा कंपनीला ही बजावली नोटिस

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बहुमजली उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (Pune Metropolitan Development Authority) हिंजेवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjewadi to Shivajinagar Metro) प्रकल्पाचे काम ही सुरु आहे. पावसामुळे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याची देखभाल दुरुस्ती मेट्रो प्रकल्प उभारत असलेल्या टाटा कंपनीला करायची आहे. त्याच अटीवर त्यांना रस्ता खोदण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याकडे कपंनी दुर्लक्ष करत आहे. विविध ठिकाणी रस्ता, सुरक्षा भिंत आदीचे पावने पाच लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या तीनपट म्हणजेच 13 लाख 70 हजार रुपय दंडाची नोटीस पाठवली आहे. तर मेट्रो प्रकल्प उभारत असलेल्या टाटा कंपनीला सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा का दाखल करु नये, अशी नोटीस मनपाच्या पथ विभागाने बजावली आहे. (PMC has sent a penalty notice of 13 lakhs to PMRDA)

पीएमआरडीएकडून गणेशखिंड रस्त्यावर संचेती रुग्णालय ते विद्यापीठ चौक दरम्यान दुमजली उड्‌डाणपुलाचे काम ग्रेड सेप्रेटरचे काम सुरु आहे. गणेशखिंड रस्त्यावरील नानावटी बंगला ते आर.बी.आय दरम्यानचा दोन्ही बाजुस रस्ता मंजुर विकास आराखड्यानुसार 45 मी. रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील कामाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. उड्डाणपुलासाठी पीएमआरडीए विभागामार्फत गर्डर लॉचिंग करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अति अवजड क्रेनचा वापर केला जात आहे. ही क्रेन रस्ता व फुटपाथवर उभे करण्यात आलेली आहेत. ती क्रेन उभी करण्यासाठी एपीआयएल हाऊस, आनंद मोहिते आणि उज्वल मोहिते यांची मिळकत, एनएच ढाबा, इत्यादी ठिकाणी पदपथ, केबल डक्ट, डीडब्ल्यू सी पाईप, कॅरजवे, सीमाभिंत इत्यादीचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच  नव्याने तयार करण्यात आलेला फुटपाथ पुर्णपणे तोडुन केबल डक्ट पाईप्स व चेबर क्रेन ठेवण्यासाठी तोडण्यात आले आहे. तसेच नव्याने तयार केलेला फुटपाथ दोन ठिकाणी क्रेनमुळे खचला आहे. एनएच ढाबा येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या डब्ल्युएमएम वर माती टाकली असल्यामुळे, रस्त्याचा सबबेस खराब झालेला आहे. त्याचप्रमाणे कॉसमॉस बैंक लगत नव्याने तयार केलेला फुटपाथवर अवजड क्रेन ठेवण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे महालििलकेने पीएमआरडीएला नोटीस पाठवली असून, त्यात दंड भरण्यास सांगितले आहे. तसेच टाटा कंपनीला समज देण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

 

सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे आपल्यावर गुन्हा का दाखल करुनये, अशी नोटीस बाजावली आहे. तसेच तीन दिवसांत महापालिकेकडे लेखी खुलास सादर करावा, असे बाजवले आहे.

Local ad 1