(Pmc Commissioner) पुणे महापालिका आयुक्तांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
पुणे : शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच इतर जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण पुण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही. परिणामी रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्तांनी Pmc Commissioner मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी रुग्णालयातील एकूण बेड पैकी 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव केले आहेत. (Eighty percent of private hospital beds are reserved for corona patients)
महापालिका आयुक्त विक्रम कुमार Pmc Commissioner यांनी दिलेल्या आदेशानुसार सुमारे दिड हजार बेड उपलब्ध होणार आहेत. तसेच हे बेड उपलब्ध करुन देण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स मिळत नाहीत. प्रामुख्याने खासगी रुग्णालयात बेड्स मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभुमीवर पालिका आयुक्त कुमार यांनी आता शहरातील खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेडपैकी 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करुन द्यावेत व उर्वरीत 20 टक्के बेड इतर आजारांवरील उपचारांसाठी ठेवावेत असे आदेश जारी केले आहेत. Pmc Commissioner
Eighty percent of private hospital beds are reserved for corona patients