पुणे : पुणे जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तर विमानतळ गरजेचा आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Purandar International Airport) सर्व प्रकारच्या परवानग्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. मी हात जोडून विनंती करतो, मला पुणे जिल्ह्यात निवडणूक लढायला याचचे नाही. मात्र, पुण्याचा विकास करायचा असेल, तर विमानतळ आवश्यक आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता हा प्रकल्प व्हायला हवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Please let Purandar Airport be made Devendra Fadnavis)
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात (Shasan Aplya dari Jejuri) उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची प्रमुख उपस्थिती होती. (Please let Purandar Airport be made : Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले, की प्रकल्पाबाबत ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करू. पुढील 20 वर्षांचे कल्याण होईल. त्यामुळे विद्यमान आमदार संजय जगताप आणि माजी आमदार विजय शिवतारे (MLA Sanjay Jagtap, former MLA Vijay Shivtare)यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील विमानतळ संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. मध्यंतरी विमानतळ खेड की पुरंदर येथे व्हावा यात बराच काळ घालवला. आज लोहगाव विमानतळावर हवाई दलाच्या विमानांची उड्डाणे सुरू होती. ही प्रात्यक्षिके देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. त्यामुळे ही प्रात्यक्षिके पूर्ण होत नाहीत, तोवर आमचे हेलिकॉप्टर उडणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्हा तिघांनाही आज जेजुरीत येण्यास विलंब झाला. काही जणांचे पुरंदरमध्येच विमानतळ झाले पाहिजे, असे मत आहे. तर, काहीजण म्हणतात थोडे पुढे झाले पाहिजे. आमचे पिढ्यान पिढ्या गाव वसले आहे, आम्ही का बाधित व्हायचे. विमानतळ, महामार्ग, धरणे करताना, शहरे आणि उद्योग वाढवताना, शिक्षण संस्था (Airports, highways, dams, industries, educational institutions) उभारण्यासाठी जमीन लागते. हा विकास हवेत करता येत नाही. त्याकरिता लागणार्या जमिनीला चांगला मोबदला देण्याकरिता प्रयत्न करू. समृद्धीसाठी लोकांचा विरोध होता, मात्र चांगला मोबदला मिळाला आणि लोकांनी समाधानाने जमिनी दिल्या.
जेजुरी एमआयडीसी करिता जमिनी घेऊन एमआयडीसी झाली म्हणूनच उद्योग व्यवसाय येथे आले. विकास करताना कुठेतरी पुढे-मागे सरकावे लागते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने सांगतो. हे सरकार विकास करताना कोणालाही वार्यावर सोडणार नाही. बाधितांना योग्य मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले.