शरद पवारांच्या सिल्वर ओकमधून थेट मंत्रालयात फोन.. पण..!
मुंबई : सिल्व्हर ओक नाव ऐकायला आलं की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव डोळ्यासमोर येते. कारण राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदु हा सिल्व्हर ओक मानलं जातं. (Silver oak mumbai sharad pawar house) परंतु आता सिल्व्हर ओक नाव चर्चेत येण्याचे कारण थोडं वेगळेच आहे. शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करत मी सिल्व्हर ओकमधून बोलतोय असा थेट फोन मंत्रालयात (Mantralay) करण्यात आला. (A direct phone call was made to the ministry saying I was speaking from Silver Oak) तो, ही बदलीसाठी. परंतु हा फोन बोगस असल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आवाज काढून एका महाभागाने थेट मुख्यमंत्री कार्यलयात फोन केला. (In Sharad Pawar’s voice, a Mahabhaga called the Chief Minister’s Office directly.) फोन करून अमुक व्यक्तीची बदली, अमुक ठिकाणी करा, असे थेट फर्मानच सोडले. खुद्द शरद पवार साहेब फोन करत आहेत, असा प्रकार कधी होत नाही. यामुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि चौकशीचे सत्र सुरु झाले. त्यानंतर चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला. हा कॉल शरद पवारांनी केलाच नव्हता. हा फोन काॅल्स बोगस असल्याचे उघडकीस आल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered at Gavdevi police station in Mumbai after a complaint was lodged by a senior officer.)
मुंबईतील प्रकार समोर आल्यानंतर असाच प्रकारण पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उघडकीस आला आहे. त्याचे झाले असे की, शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून फोन करण्यात आला. प्रतापराव वामन खंडेभारड यांच्याकडे संबंधित व्यवहारामध्ये अडकलेले पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे ( रा.यशवंत नगर, खराडी, पुणे ) आणि त्याचा एक अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Silver oak mumbai sharad pawar house)