Sassoon Hospital Pune । पुण्यासह राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या पुण्यातील ससून सर्वोपचार केंद्रात (Sassoon Health Care Centre) आता कर्करोगावरील महागड्या चाचण्या अल्पदरात होत आहेत. त्याची सुरुवात झाली असून, रुग्णांना लाभही होत आहे. काय आहेत, चाचण्या या चाचण्या करण्यासाठी खासगी लॅबमध्ये किती खर्च येत होता, आता ससूनमध्ये किती खर्च येईल. हे जाणून घेऊया. विशेष म्हणजे हि चाचणी राज्यातील कुठल्याही रुग्णाला अल्पदरात पेट स्कॅन चाचणी करता येईल. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)
कर्करोगाचे कारणे
बदललेली जीवनशैली, खानपानाच्या सवयी, व्यसन आणि भाज्यांवर जाणारा कीटकनाशकांचा अतिवापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. आताचा तोंडाचा, फुप्फुस, कृत किडनी अशा विविध अवयवांच्या कर्करोगाचे प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)
प्रत्येक तपासणीचे किती दर निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार दर आकारले जातात. मात्र, खासगी लॅब पेक्षा हे दर 50 टक्क्यांच्या आतच आहेत. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख शेफाली पवार असून, इंटरव्हेंशनल रेडिओजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे सहयोगी प्राध्यापक डॉ. इब्राहिम अन्सारी हे काम पहात आहेत. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)
ससून रुग्णालयात दररोज 25 रुग्णांचे पेट स्कॅन तपासणी होऊ केली जाते. स्पेक्ट स्कॅन द्वारे एमडीपी बोन स्कॅन तपासणीतून हाडांमधील ऑस्टिओपोरोसिस, थायराॅईड व त्यांचे कार्य, टी-थ्री, टिएसएच व त्यांच्या ग्रंथीचा स्त्राव याचे कार्य, फुफ्फुस व मेंदुचे कार्य, मायोकार्डियल फंक्शनमध्ये हृदयाच्या स्नायूंना किती व कसा रक्तपुरवठा याची तपासणी केली जाते.– डॉ. इब्राहिम अन्सारी, रेडिओलाॅजिस्ट व समन्यवक पेट सीटी स्कॅन विभाग, ससून रुग्णालय पुणे.