पुणे. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनमध्ये (Pune Petrol Dealers Association) 900 वितरक / वाहतूकदारांचा समावेश आहे, तेल कंपन्यांशी अनुचित निविदा पद्धती आणि इंधन वाहतुकीतील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोरीला कंटाळले आहेत. अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने 15 ऑक्टोबर 2024 पासून अनिश्चित काळासाठी संपवार जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, टँकर टर्मिनलवर लोड करण्यासाठी पाठवणार नाहीत, अशी भिमुका घेतली आहे. (Petroleum sellers, transporters in Pune will go on strike from October 15)
अयोग्य निविदा पद्धती : तेल कंपन्यांनी व्यवहार्य नसलेल्या दरांसह निविदा काढल्या आहेत, ज्यामुळे विक्रेत्यांना रिक्त कागदपत्रे,करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जाते. हे कमी दर स्वीकारणारे 65 टक्के वाहतूकदार चोरीमध्ये गुंतलेले आहेत, हे पोलिसांनी केलेल्या कारवायीतुन स्पष्ट झाले आहे.