जिल्हाधिकारी यांच्यासोबतची बैठक ठरली निष्फळ ; पेट्रोल – डिझेल वाहतूकदार बेमुदत संपावर जाण्यासाठी ठाम !
पुणे. पेट्रोलियम कंपन्यांकडून विविध मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील इंधन वाहतूकदार (Fuel Transporter) मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. यामुळे पेट्रोल पपांना वेळेत इंधर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ शकतात. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी भारत पेट्रोलिएम, इंडिएन आईल, हिंदुस्तान पेट्रोलियम (Bharat Petroleum, Indian Oil, Hindustan Petroleum) कंपनीचे उच्चस्तरीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तुम्ही काहीही करा, पंपाने इंधन पोहोच याची सोय करा, अशा सूचना दिल्या आहेत. (Petrol-diesel transporters will go on indefinite strike)
असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत १५ ऑक्टोबरपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात आणि वितरकांना कोरे कागद अथवा करारपत्रावर सही करायला भाग पाडले जाते. पेट्रोलियम कंपन्यांकडून वाहतुकीसाठी कमी दर स्वीकारणारे अनेक वाहतूकदार इंधन चोरीमध्ये गुंतलेले आहेत. त्यातील ६५ टक्के जणांना पोलिसांनी आधी पकडलेही होते. सर्व भागधारकांना विचारात न घेता पेट्रोलियम कंपन्या पावले उचलत आहेत. यामुळे इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात असून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.
इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे गेल्या दोन वर्षांत इंधन चोरीच्या १० घटनांची नोंद झाली आहे. अशाच इंधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केली. पेट्रोलियम कंपन्यांकडून चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाल्याने या चोऱ्या होत आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.
आम्ही बेमुदत बंदची सूचना पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांना आधीच दिली आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची असेल.
– ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे.
,