पुणे जिल्ह्यातील 900 पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदार आंदोलनावर ठाम ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक

तेल कंपन्यांशी अनुचित निविदा पद्धती आणि इंधन वाहतुकीतील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोरीचे प्रकार थांबत नाहीत, यामुळे पुणे जिल्ह्यातील 900 पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदारांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहने 5 ऑक्टोबर 2024 पासून अनिश्चित काळासाठी न पाठवण्याचा इशारा दिला आहे. (900 petroleum sellers, transporters of Pune district insist on agitation) सरकारने यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुणे आणि सातारा जिल्ह्यात पेट्रोलिम पदार्थाची टंचाई भासू शकते. त्यामुळे सरकारने पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.