पुणे जिल्ह्यातील 900 पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदार आंदोलनावर ठाम ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक
पुणे. तेल कंपन्यांशी अनुचित निविदा पद्धती आणि इंधन वाहतुकीतील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोरीचे प्रकार थांबत नाहीत, यामुळे पुणे जिल्ह्यातील 900 पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदारांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहने 5 ऑक्टोबर 2024 पासून अनिश्चित काळासाठी न पाठवण्याचा इशारा दिला आहे. (900 petroleum sellers, transporters of Pune district insist on agitation) सरकारने यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुणे आणि सातारा जिल्ह्यात पेट्रोलिम पदार्थाची टंचाई भासू शकते. त्यामुळे सरकारने पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. तेल कंपन्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या (Pune Petrol Dealers Association) पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या आंदोलनाची माहीत पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि तेल कंपन्यांना या नियोजित आंदोलनाबाबत आधीच दिली आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे नागरिकांची गौरसोय झाल्यास त्याल सरकार जबाबदार असेल, असे सांगण्यात आले आहे. (Petrol diesel sellers in Pune will protest)
राज्य मंत्रिमंडळाने घेतले रेकाॅर्ड ब्रेक निर्णय ; कोणते आहेत निर्णय जाणून घ्या (भाग – १ )
तेल कंपन्यांनी व्यवहार्य नसलेल्या दरांसह निविदा काढल्या आहेत, ज्यामुळे विक्रेत्यांना रिक्त कागदपत्रे/करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जाते. हे कमी दर स्वीकारणारे 65 टक्के वाहतूकदार इंधनाच्या चोरीमध्ये गुंतलेले आहेत, हे पोलिसांनी आजपर्यंत केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. तेल कंपन्या भागधारकांशी सल्लामसलत न करता किंवा खर्चचा हिशोब विचारात न घेता कमी दर बँड देत आहेत. पेट्रोलियम वाहतुकीची सुरक्षितता गृहीत धरली जात नाही, ज्यामुळे कंपन्या आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करत असल्याने इंधनाची चोरी आणि इंधनात भेसळीचा धोका निर्माण होत आहे. ऑयल कंपनी च्या प्रतिनिधींकडे चोरीला आळा घालण्यासाठी संघटनेने वारंवार केलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. गेल्या दोन वर्षांत 10 हून अधिक चोरीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ई-लॉकिंग आणि वाहनांच्या ट्रॅकिंगसारख्या चोरी-प्रूफ प्रणालींमध्ये कंपन्या आणि डीलर्स कढुन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेण्यात आली. परंतु चोरी चे सत्र सुरूच आहे. या यंत्रणांवर देखरेख ठेवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकार सुरु आहेत.
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानेच पेट्रोल डिझेल चोरी
पेट्रोल आणि डिझेलसारख्या स्फोटक पदार्थांची वाहतुकावर लक्ष ठेवण्यात जबाबदारी असलेले कंपनीचे अधिकारीच इंधन चोरीला प्रोत्साहन देत आहेत, हे मदत करणारे कंपनी अधिकारी, त्यांना कुठेही दोषी धरले जात नाही, त्यामुळे गुन्हा करुनही मुक्त आहेत, हे इंधन वाहतुकीसाठी गंभीर आहे, असे पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रात आरोप करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतले रेकाॅर्ड ब्रेक निर्णय ; कोणते आहेत निर्णय जाणून घ्या (भाग-२)
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबतची बैठक ठरली निष्फळ
जिल्ह्यातील सरकारी असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलिएम, भारत आणि इंडियन आॅईलच्या (Indian Oil, Hindustan And Bharat Petroleum) कंपनीतील अधिकारी आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे बैठक झाली. त्यात तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे सांगितले. त्यामुळे विक्रेत्यांनी तोडगा काढण्याच्या बैठकीसाठी राज्य तेल समन्वयकांना सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी केली. मात्र, या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाही.
पुण्यातील पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदार 15 ऑक्टोबर पासून संपावर जाणार
ट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
पुणे शहर आणि जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलिएम, भारत आणि इंडियन आॅईल कंपनीचे 900 पंप आहेत. या पंपाना इंधन पुरवठा करण्यासाठी 600 गाड्या दररोज वाहतूक इंधन वाहतूक करतात. त्यामुळे वाहतूकदार संपवार गेल्यास शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सातारा पेट्रोल डीलर असोसिएशन ही होणार आंदोलनात सहभागी
सातारा पेट्रोल डीलर असोसिएशननेही (Satara Petrol Dealers Association) पुणे पीडीएच्या आंदोलनाला पाठिंबा दिले असून त्यांनीही आंदोलनात सहभागी होण्याचा आणि 15 ऑक्टोबरपासून त्यांचे टँकर लोडिंगसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.