राज्यातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण
पुणे : केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Maharashtra Reduced VAT) कपात केली. त्याची अंमलबजावणी झाली. मात्र, रविवारी राज्य सरकराने ही घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात दर कपात झाली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. त्यावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Petrol-diesel became cheaper in ‘Ya’ city of the state)
राज्य सरकारने सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबादमधील दर कमी केले असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध करून 21 मे पासून कपात लागू झाल्याचे स्पष्ट केले आहे. (Petrol-diesel became cheaper in ‘Ya’ city of the state)
केंद्र शासनाने #पेट्रोल आणि #डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (#VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. pic.twitter.com/2BtoUW0Ooi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 22, 2022
राज्य सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर 21 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महापालिका 9Mumbai, Thane, Navi Mumbai, Amravati and Aurangabad Municipal Corporations) हद्दीत पेट्रोलचे दर 32 रुपये 90 पैशांऐवजी 30 रुपये 82 पैसे प्रतिलिटर झाले आहेत.तर डिझेलचे दर 22 रुपये 70 पैशांऐवजी 21 रुपये 26 पैसे इतके करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील इतर शहरातील दर कमी का झाले नाहीत, असा सवाल विचारला जात आहे. (Petrol-diesel became cheaper in ‘Ya’ city of the state)