राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; ८४३ व्यक्तींना अटक

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly General Election) पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने (State Excise Department) १ ऑक्टोबर २०२४ पासून ९२३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९६ वाहनासह ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत (State Excise Pune Superintendent C.B. Rajput) यांनी दिली आहे. (performance of state excise department ; 843 persons arrested)