वाईन विक्रीच्या निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या..

पुणे : गेल्या दोन दिवसापूर्वी सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला (Permission to sell wine in markets and grocery stores) राज्य मंत्रमंडळाने (State Cabinet) मंजुरी दिली. त्यानंतर राज्यात वाईन विक्रीचीच (Wine sales) चर्चा सुरु झाली. त्यात विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करायचा का असा सवाल करुन टिका करत आहेत. तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्सोहान देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar’s first reaction after the decision to sell wine, know ..)

 

Wine in Maharashtra। सुपर मार्केट, वॉक इन स्टोअरमध्ये मिळणार वाईन

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले, “राज्यातील विरोधी पक्षातील नेते सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीच्या (Wine sales) निर्णयाला विरोध करत आहेत. त्यांना हे माहित नाही, की समजून घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. आम्ही दारु नाही तर वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. मुळात वाईन आणि दारुमध्ये (Alcohol) जमीन आस्मानचा फरक आहे. हे सगळ्यांना माहित आहे. आपल्या शेजारील मध्यप्रदेश सरकारने घरात दारु साठविण्याच्या परवानगी नुकतीच दिली आहे. हा निर्णय त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे”, अशी प्रतिक्रीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar’s first reaction after the decision to sell wine, know ..)

अजित पवार म्हणाले, वाईन आणि दारुमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. अनेक देशात पाणी म्हणून वाईन घेतली जाते. आपल्याकडे वाईन उद्योगाला पर्यायाने शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीचे मिनिटस तापसल्या नंतरच निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar’s first reaction after the decision to sell wine, know ..)

Local ad 1