पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel price) दरवाढीवर रोहित पवार पुन्हा भडकले
रोहित पवार म्हणतात 'ये पेट्रोल के भाव १०८ अॅब्यूलन्स पर क्यो लिखे है ?
पुणे : देशात व राज्यात रोजच पेट्रोल व डिझेलची दरवाढ सुरू आहे. (Petrol and diesel prices are going up) या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. पेट्रोलने शतक पार केल्यानंतर आता डिझेलही शतकाच्या जवळ पोहचले आहे या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी इंधन दरवाढीविरोधात सरकारविरोधात पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. Rohit Pawar erupts again over petrol-diesel price hike
आमदार रोहित पवार यांनी डिझेल दरवाढीवर भाष्य करणारे एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी एक कार्टून टाकले आहे. कार्टूनमध्ये एक रुग्णवाहिका दाखवण्यात आली असून त्यावर ‘ये पेट्रोल के भाव १०८ ambulance पर क्यो लिखे है ? ‘ असा सवाल केला आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, हे कार्टून बघून हसायला आलं आणि वाईटही वाटलं. आता १०० रूपयांच्या जवळपास आलेले डिझेलचे दरही असेच वाढतात की काय अशी भीती वाटते. महागाई भडकल्याच्या बातम्या आजच वाचायला मिळाल्या. डिझेलही असेच भडकले तर सर्वसामान्यांचे कसे होणार ? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. Rohit Pawar erupts again over petrol-diesel price hike
हे कार्टून बघून हसायला आलं आणि वाईटही वाटलं… आता १०० ₹ च्या जवळपास आलेले डिझेलचे दरही असेच वाढतात की काय अशी भीती वाटतेय!!! महागाई भडकल्याच्या बातम्या आजच वाचायला मिळाल्या… डिझेलही असंच भडकलं तर सर्वसामान्यांचं कसं होणार? pic.twitter.com/VgHL3B7LJM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2021