Shikshak Bharti 2024 । शिक्षक भरतीची जाहिरात प्रवित्र पोर्टलवर प्रसिद्ध

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 । मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रीया अखेर सुरू झाली असून काही जिल्हापरीषदांनी पदभरतीची जाहिरात दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 12 हजार पदांची जाहीरात देण्यात आली आहे.

Shikshak Bharti 2024 । मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रीया अखेर सुरू झाली असून काही जिल्हापरीषदांनी पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टवर (Pavitra Portal) दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 12 हजार पदांची जाहीरात देण्यात आली आहे. परंतु येत्या 15 जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. (Pavitra Portal Shikshak Bharti 2024, Advertisement for more than 12 thousand posts of teacher recruitment)

 

 

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. परंतु रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु काही आमदारांनी रोष्टर तपासाणीबाबत आक्षेप घेतला. त्यामुळे 10 टक्के जागा बाजूला ठेवून 70 टक्के पदांची जाहिरात काढणार येणार आहे. असे असले तरी साधारण 30 हजारांच्या आसपास जागा भरल्या जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Pavitra Portal Shikshak Bharti 2024, Advertisement for more than 12 thousand posts of teacher recruitment

 

जिल्हा परीषद, नगरपरीषद आणि छोट्या स्थानिक संस्थांच्या रोष्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता काही मोठ्या खासगी संस्थाच्या रोष्टरची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 10 दिवसांमध्ये संबंधित संस्थांची रोष्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन त्या संस्थाच्या जाहीराती देखील प्रसिध्द होतील. त्यानंतरच यंदा नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

 

Local ad 1