कंधार तालुक्यातील शेती नुकसानीचे होणार पंचनामे

कंधार : कंधार तालुक्यसह सर्वत्र अतिवृष्टीमुळे नदी नाल्याना पूर आले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, आता या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिले आहेत. त्यासाठी कर्मचारी, पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (There will be panchanama of agricultural losses in Kandahar taluka)

 

 

 

तालुक्यातील 13 व 14 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपीके, फळपिके यांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन विटनकर यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार तालुक्यात पंचनामे केले जाणार आहेत. (There will be panchanama of agricultural losses in Kandahar taluka)

 

 

कंधार तालुक्यातील बारुळ, कंधार, कुरुळा, फुलवळ उस्माननगर दिग्रस बु पेठवडज या 07 मंडळात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नदीकाठ, ओठे/नाले लगत पिकाचे नुकसान पुराच्या पाण्यामुळे झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शेतीपिकाचे 33 टक्के किवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासन निर्णयाप्रमाणे कंधार तालुक्यातील बाधीत शेतकरी यांना मदत देण्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक, यांनी बाधीत शेतकरी यांचे पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करा, अशा सूचना केली आहे. (There will be panchanama of agricultural losses in Kandahar taluka)

 

  • असे होणार पंचनामे

1. पिकाचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असणे आवश्यक आहे.
2. प्रत्येक शेतकरी यांचे शेतातील नुकसान झालेल्या पिकांचा वयक्तिक खातेदार करणे
3. पिक नुकसानीचे G.P.S. स्मार्ट मोबाईल व्दारा फोटो काढावेत.
4. बाधीत पिकाचा विमा काढण्यात आलेला आहे किंवा नाही यांची स्पष्ट नोंद पंचनामा अहवालामध्ये असणे आवश्यक आहे.
5. बाधीत इसलेला शेतकरी एकही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
6. विहित मनुन्यात पंचनामा सादर करणे.
7. अहवाल हार्ड व सॉफ्ट कॉपीसह सादर करावा.

 

 

Local ad 1