Palkhi Sohala 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त (sant dnyaneshwar maharaj sant tukaram maharaj palkhi sohala 2023) जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. (traffic changes on route for palkhi sohala pune maharashtra)
Mumbai-Nanded Vande Bharat Express : नांदेडकरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जुन या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. (traffic changes on route for palkhi sohala pune maharashtra)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल
- पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील.सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.
- सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – १६ जून रात्री २ वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.
- वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)– १८ जून रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा. लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- १६ ते १८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग
- लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
- यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम) – १६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
- वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)– १७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.
- उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) – १८ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.
- बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) – १९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापुरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शन कडे जाईल.
- सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- २० जून रोजी पहाटे २ ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत व २१ जून रोजी पहाटे २ ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.
- निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) २२ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस – जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.
- इंदापूर- २३ जून रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुते मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.
- इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- २४ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत व २५ जून रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.