...

Oxford Golf Cup । ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा एके पुना लाइन्स संघ विजेता

Oxford Golf Cup । पुणे : ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आयोजीत ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा अंतिम सामना एके पुना लायन्स विरुद्ध रोरिंग टायगर्स नागपूर (Roaring Tigers Nagpur) यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा झाला. या सामन्यात पुना लायन्सने बाजी मारत ऑक्सफर्ड गोल्फ चषकावर (Oxford Golf Cup) आपले नाव कोरले. (AKPune Lines Team Winner of Oxford Golf League)

 

रोरिंग टायगर्स नागपूर ने ९.५ गुण मिळवले तर पुना लाइन्स १०.५ गुण मिळवित विजयावर शिक्कामोर्तब केले. या संघाचे कर्णधार राजीव पुसाळकर आणि उपकर्णधार अँड्र्यू पिंटो, रोंनाक जैन, श्रीराम सुभ्रमण्यम, विनय अग्रवाल, सचिन रणभीसे, दिनेश सूद, रमेश कौशिक, सतीश सिंग, राज दत्ता,बलराजसिंग परमार, सुभ्रमण्यम एम.के, मिक्युंग जिऑंग, सुजित कक्कड या (Rajiv Pusalkar and vice-captain Andrew Pinto, Ronak Jain, Sriram Subrahmanyam, Vinay Agarwal, Sachin Ranbhise, Dinesh Sood, Ramesh Kaushik, Satish Singh, Raj Dutta, Balraj Singh Parmar, Subrahmanyam MK, Mikyung Jeong, Sujit Kakkad) खेळाडूंचा संघात सहभागी होते.

 

दिमाखदार सोहळ्यात विजयी संघाला अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा चषक ऑक्सफर्ड गोल्फ क्लबचे अनिल सेवलेकर व एस.गोल्फिंगचे आदित्य मालपणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . याबरोबरच चार लाखाचे बक्षीस ही देण्यात आले. संघातील रोनक जैन या खेळाडूस लीगचा सर्वोउत्कृष्ठ खेळाडू हा किताब मिळाला .

 

 

रोरिंग टायगर्स नागपूर हा संघ उपविजेता ठरला. या संघाला दुसऱ्या क्रमाकाचे परितोषक देण्यात आले. या लीगमध्ये देशभरातील सुमारे आठ संघ सहभागी झाले होते. ते इगल फोर्सेस ,शुब्बान सनराइजर्स, ऐस.जे.सुलतान ऑफ स्विंग, रोरिंग टायगर्स नागपूर, एके पुना लायन्स, द लीजन्सी क्लब, विंग वॉरियर्स, ग्रीन ग्लॅडिएटर्स यांचा समावेश होता.

एका संघामध्ये पंधरा खेळाडू सहभागी झाले होते. आठ संघामध्ये एकूण १२० देशभरातील नामांकित खेळाडू सहभाग घेऊन खेळत होते. देशातील सर्वात नयनरम्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमध्ये ही स्पर्धा पार पडली.

Local ad 1