(Quarantined) …तर पुणेकरांना 15 दिवसांसाठी व्हावे लागणार क्वारंटाइन

पुणे ः  पुणे शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, ज्या तुलनेत कमी झाली पाहिजे, त्याप्राणात  कमी होत नाही. पुणे शहरात विकेंड लॉकडाऊन आहे तसाच सुरू ठेवला जाणार आहे. तसेच पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्या बाहेर जाणाऱ्यांना पुणेकरांना पंधरा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असा इशारा दिला आहे. If you go out for tourism, you have to be quarantined

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. If you go out for tourism, you have to be quarantined

पुणे शहर तसेच ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरात विकेंड लॉकडाऊन रद्द होईल तर ग्रामीण भागात अत्यावश्यक वगळता इतर सेवा सुरु होतील अशी अपेक्षा होती. परंतु कोणताही दिलासा  मिळालेला नाही. सर्व बंधनं आहेत तशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी चाचण्या वाढण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. आता नवीन नियमानुसार दुकानदारांची तसेच कर्मचाऱ्यांची दर पंधरा दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे. If you go out for tourism, you have to be quarantined

Local ad 1