...

…तर आमचाही पक्ष पठाण चित्रपटाला विरोध करेल : रामदास आठवले

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale) यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरील (Maratha reservation protestors) गुन्हे मागे घेण्यात आले. त्याप्रामाणेच कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) प्रकरणातील ही गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी  “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना भेटून निवेदन देणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. (Our party will also oppose Pathan film : Ramdas Athavale)

 

आठवले म्हणाले, 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी अभिवादनासाठी जमतात आधी केवळ आमचीच सभा तिथे होत होती. परंतु आता अनेकजण सभा घेत आहेत. मात्र, आता प्रशासनाने त्या परिसरात सभा घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पंरतु, स्तंभ परिसराच्या बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणीही आठवले यांनी केली. (Our party will also oppose Pathan film : Ramdas Athavale)

चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य करायला नको होते..

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आठवेल म्हणाले, चंद्रकांत पाटील राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांच्या त्या वक्तव्याशी कुणीही सहमत नाही. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लोकांचा रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. शाईफेक प्रकरणात संशयितांवर लावलेले कलम 307 मागे घ्यावे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी  बोललो. त्यानंतर ते कमल मागे घेण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.

समान नागरी कायद्यामुळे आरक्षण जाणार नाही

समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा असून, हा कायदा कुठल्याही धर्मा विरोधात नाही. लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे. समान नागरी कायद्यामुळे आरक्षण जाणार हे म्हणणं चुकीचं आहे. आणि जर आरक्षण केलं तर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही पण यामुळे आरक्षण जाणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. (Our party will also oppose Pathan film : Ramdas Athavale)

म्हणून आम्ही मोदींसोबत..

खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) काढत राहावी. भारत जोडण्याची आवश्यकता नाही, बाबासाहेबांनी संविधानाने जोडल्या गेला आहे. काँग्रेसकडे सत्ता होती. मात्र, त्यांना गांधी, बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी होती पण ती त्यांनी नाही केली. काँग्रेसने भारत जोडला नाही, म्हणून राहुल गांधी यांच्यावर ही वेळ आली. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे आठवले यांनी सांगितले. (Our party will also oppose Pathan film : Ramdas Athavale)

पठाण चित्रपटात विरोधात आंदोलन करणार

पठाण चित्रपटाला (Pathan movie) आमचा विरोध नाही. पण चित्रपटात भगव्या रंगाला बेशरम रंग अस गाणं (Besharam Rang Song) आणि वक्तव्य आहे. भगवा रंग हा जसा भाजप-शिवसेना यांचा आहे तसाच तो आमच्या गौतम बुद्धांच्या चिवरचा रंग देखील भगवा आहे. अडीच हजार वर्षापूर्वी हा रंग शांततेचा रंग म्हणून पुढे आणण्यात आला. हा आमच्या बौद्ध धर्माचा देखील अपमान आहे. या चित्रपटातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे अन्यथा आमचा पक्ष देखील या चित्रपटात विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे आठवले म्हणाले.

Local ad 1