Osmanabad ACB Trap । वृध्द शेतकऱ्याकडून दोन लाख रूपयांची लाच स्वीकारताना संपादकासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात !

Osmanabad ACB Trap । उस्मानाबाद : संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच स्वीकारताना एका संपादकासह खाजगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Osmanabad Anti-Corruption Department) (एसीबी) 15 जूलै 2023 रोजी उस्मानाबाद येथे केली.

 

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 77 वर्षीय तक्रारदार पुरूषाच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन पाझर तलाव व साठवण तलावासाठी (Seepage pond, storage pond) शासनाने संपादित केली आहे. या जमिनीचा उस्मानाबाद प्रांत कार्यालयातील (Osmanabad Province Office) अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन संपादित जमीनीचा अधिकचा मोबदला मिळवून देण्यासाठी अनिरुद्ध अंबऋषि कावळे (Aniruddha Ambrishi Kavale), (वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) व दैनिक मराठवाडा योध्दाचा संपादक बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे, (Babasaheb Harishchandra Andhare -Editor of Daily Marathwada Yodha) (वय 42 वर्षे, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद) या दोघांनी 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

राज्यातील 422 आजी-माजी खासदार,आमदारांवर गंभीर गुन्हे ; एडीआर संस्थेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

 

सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना दोघांना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराच्या पत्नीला 26,56,017/- रुपये व 4,31,798/- असे एकुण 30 लाख 87 हजार 815 रूपयांचे दोन चेक मिळणार होते. उस्मानाबाद प्रांत कार्यालयातून हे दोन चेक काढून देण्यासाठी दैनिक मराठवाडा योध्दाच्या संपादकासह एका खाजगी इसमाने दोन लाख रूपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना दोघांना एसीबीने पकडले आहे.

 

Osmanabad ACB Trap. While accepting a bribe of two lakh rupees from an old farmer, a private person with an editor in the net of ACB

 

ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विकास राठोड (Police inspector Vikas Rathod of Osmanabad anti-corruption department) यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांचा समावेश होता.

Local ad 1