राऊतखेडा येथे अखंड शिवनाम सप्ताहा व परमरहस्य पारायण सोहळा

कंधार : श्री. ष. ब्र. १०८ .प.पु.राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने, श्री.ष.ब्र.१०८ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री.ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड यांच्या आशिर्वादाने कंधार तालुक्यातील राऊतखेडा येथे ६ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आला आहे. (Organizing Akhand Shivnam Saptah and Paramahasya Parayan ceremony at Rautkheda)

 

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ ते ६ शिवपाठ, ७ ते ९ परमरहस्य पारायण, २ ते ४ गाथ्यावरील भजन, ४ ते ५ प्रवचन, ६ ते ७ शिवपाठ, रात्री ९ ते ११ शिवकिर्तनकार, दि.६ फेब्रुवारी रोजी शि. भ. प. चंद्रकांत अमलापुरे, दि ७ फेब्रुवारी शि. भ.प मारोती महाराज भालके, दि ८ फेब्रुवारी शि.भ.प.विकास महाराज भुरे, दि ९ फेब्रुवारी शि.भ.प.मन्मथअप्पा डांगे, दि १० फेब्रुवारी शि.भ.प.सुनीताताई शिगंनवाड चाडोळकर, दि ११ शि.भ.प.विश्वाभंर बडूरे महाराज, दि.१२ शि.भ,प.तानाजी पाटील थोटवाडीकर, दि १३ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे किर्तन शि.भ.प. शिवानंद महाराज दापशेडकर याचे किर्तन होणार आहे. परिसरातील भाविकानी लाभ घेण्याचे अहवान मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. (Organizing Akhand Shivnam Saptah and Paramahasya Parayan ceremony at Rautkheda)

Local ad 1