पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासोबत लाभ देण्यासाठी मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वा. सांस्कृतिक सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan), येरवडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Organizing a gathering to benefit the schemes of Sahitya Ratna Anna Bhau Sathe Corporation)
महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पुणे व सातारा जिल्ह्यातील या समाजघटकांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पोहोचण्याकरिता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यामध्ये राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के (Social Justice and Special Assistant Department Secretary Sumant Bhange, Corporation Managing Director Manish Sangle, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) Director General Sunil Vare, Corporation General Manager Anil Mhaske) आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.
Organizing a gathering to benefit the schemes of Sahitya Ratna Anna Bhau Sathe Corporation, Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Social Justice and Special Assistant Department Secretary Sumant Bhange, Corporation Managing Director Manish Sangle, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) Director General Sunil Vare, Corporation General Manager Anil Mhaske,