IMD updates । राज्यात ऑरेंज, यलो अलर्ट जारी, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस

IMD updates । मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. आता पुणे वेधशाळेने (आयएमडी)  पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट  (yellow alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. (Orange, yellow alert issued in the state)

 

यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटावर संकट आले आहे. कारण यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून बाकी आहेत. आता पुन्हा पाऊस व गारपीटचे संकट आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे. (Orange, yellow alert issued in the state)

 

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की, नगर, पुणे बीड, उस्मानाबाद, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तसेच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १५ आणि १६ एप्रिल रोजी काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. १७ एप्रिलपासून वातावरण पुन्हा चांगले होणार आहे. (Orange, yellow alert issued in the state)

Local ad 1