राज्यातील “या” जिल्ह्यात आज पावसाचा जोर असणार

मुंबई Weather update : गेली काही दिवस पावसाला पोषक वातावरण नव्हते. त्यामुळे पाऊस न झाल्याने खरीप पिके हाताची गेली आहेत. परंतु आज सोमवारी पावसाला पोषक हवामान आहे. (The next four days will be rainy) राज्यातील काही जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, त्यात कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, (Ratnagiri, Sindhudurg and Raigad districts) मराठवाड्यातील परभणी हिंगोली. नांदेड, लातूर जिल्ह्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. (Orange alert has been issued in Nanded, Parbhani and Hingoli districts)

 

 

 

पोषक हवामानामुळे राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. रविवारी मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मॉन्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीमध्ये असून, अनुपगड पासून, हिस्सार, दिल्ली, बालंगीर, कलिंगापट्टनम ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पुढील तीन ते चार दिवस तो दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि परिसरावर एक, कच्छ आणि परिसरावर एक आणि वायव्य राजस्थान आणि परिसरावर एक अशी तीन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. (The next four days will be rainy)

 

दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि पूर्व-मध्य भागात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज सोमवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे (Orange alert has been issued in Nanded, Parbhani and Hingoli districts) गुरूवार पर्यंत (दि. ९) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (The next four days will be rainy)

 

 

Local ad 1