पुणे जिल्हा परिषदेमध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी ; कोण करु शकतो अर्ज?

पुणे. शिक्षण घेताना पुणे जिल्हा परिषदेमध्ये (Pune Zilla Parishad) काम करण्याची संधी असून, त्यासाठी शिक्षण घेतल असलेले विद्यार्थी असायला पाहिजे. सन 2024-25  या वर्षामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ (‘Earn and Learn‘) योजनेअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देणे साठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २० टक्के मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देणेची नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे. (Opportunity to work as an intern in Pune Zilla Parishad; who can)

 

 

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी ८,००० रुपये, दुसऱ्या वर्षी रु. ९,००० रुपये आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,००० रुपये  विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी मिळणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला निवास आणि भोजन हेतु ४ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा दिला जाणार आहे.    जिल्हा परिषदेमध्ये इंटर्न म्हणून सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम ज्यातून प्रतिमहिना स्टायपेंड (शिष्यवृत्ती) आणि ऑनलाईन पद्धतीने स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (Indira Gandhi National Open University) बीबीए म्हणजे च Bachler in Business Administration (Service Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे जिल्हा परिषद कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच १२ वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्याधारीत शिक्षण हे स्वत:च्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.

 

 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ ते २४ वयोगटातील नुकतेच बारावी पास असलेल्या किंवा अर्धवट राहून गेलेल्या पदवीचे शिक्षणपूर्ण करू इच्छिणार्‍या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी SC/ ST/ VJ / NT प्रवर्गातील या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद पुणे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

 

इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जून  २०२४ अशी असून त्यासाठी https://applyignou.mkcl.org/#/ ही ऑनलाईन लिंक समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

Local ad 1