जिल्ह्यातील गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याची संधी

नांदेड : गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड (चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास 31 मार्च 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करावेत, असे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. (Opportunity to apply for regularization of gunthewari in the district)

 

 

 

जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेशान्वये महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. (Opportunity to apply for regularization of gunthewari in the district)

 

 नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडे नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्यामार्फत छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करुन घेवून गुंठेवारीची सनद निर्गमित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. (Opportunity to apply for regularization of gunthewari in the district)
Local ad 1