राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) (Congress, Nationalist Congress Party and Shiv Sena (Thackeray Group)) यांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर तोंडावर काळी मुखपट्टी बांधुन आंदोलन करण्यात आले. (Opponents protested the action against Rahul Gandhi by tying black masks on their faces)
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या विरोधात सुडबुध्दीचे राजकारण करुन केंद्रातील भाजपा सरकारने शासकीय यंत्रणांचा गैरफायदा घेत त्यांची खासदारकी रद्द केली. या दडपशाहीचा निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर मौन आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह काळी मुखपट्टी बांधून व फलके घेऊन केंद्रातील भाजपा सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला आहे. (Opponents protested the action against Rahul Gandhi by tying black masks on their faces)
या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole), राष्ट्रवादीचे जयंत पाटील (NCP President Jayant Patil), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) , बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Shiv Sena’s Aditya Thackeray), बंटी पाटील, डाॅ. नितीन राऊत, आमदार चेतन तुपे, प्रज्ञा सातव यांच्यासह अन्य आमदार सहभागी झाले होते. (Opponents protested the action against Rahul Gandhi by tying black masks on their faces)