(Prices of agricultural) विकेल ते पिकेल तरच शेतमालाला भाव मिळेल : एकनाथ डवले   

नांदेड  : विकेल ते पिकेल यासाठी तालुका पातळीवरुन ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजेत, त्या प्रामाणात होत नाहीत. शेतकऱ्यांचे गटस्थापन करुन त्यांनी केलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे, असे मत कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. (Only then will the prices of agricultural commodities go up)

जिल्ह्यातील विविध विकास योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचे कृषि अधिकारी उपस्थित होते. (Only then will the prices of agricultural commodities go up)

विकेल ते पिकेल याचा अर्थ केवळ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अथवा शेतीचे उत्पादन घेऊन बाजारात बसणे किंवा शेतकऱ्यांना बाजारात बसविण्यासाठी मदत करणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही. कृषि विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांशी समन्वय साधत यादृष्टिने शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे व हे प्रक्रिया करुन उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव कसा मिळेल याचे संपूर्ण कसब देण्यापर्यंतची भूमिका ही शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे, असे सांगितले.(Only then will the prices of agricultural commodities go up)

कापसासारख्या पिकासाठी “एक गाव एक वान” जर लागवडीखाली आले, कापसाच्या उत्पादनाला काढणी पश्चात तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर अशा कापसाला अधिकचा भाव मिळू शकेल. धागा चांगला यावा यासाठी कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. स्मार्ट कॉटनसाठी अग्रह धरला पाहिजे व शिवाय कापसावर बोंडआळी व्यतिरिक्त बोंडसरसाठी अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यात देगलूर, अर्धापूर आणि इतर काही ठिकाणी करडी, हळद व इतर पिकातून झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (Only then will the prices of agricultural commodities go up)

Local ad 1