Kunbi certificate । कोणाला मिळू शकतो कुणबी असल्याचा दाखला ; तेरा कागदपत्रके तपासली जाणार 

Kunbi certificate । मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाले. आता राज्य शासनाने कुणबी असल्याच्या नोंदणी शोधण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील आणि विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  (Only if you have these documents will you get the Kunbi certificate)

 

 

 

कुणबी नोंदी शोधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याने अनुसरलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. 1948 पूर्वीची आणि 1948 ते 1967 या कालावधीतील नोंदींची माहिती घेतली जात आहे. नोंदी घेण्यासाठी तालुका स्तरावरही समित्यांची स्थापन करण्यात आली असून, याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. तसेच झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्यात न्या.शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे.

 

बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनाकडून प्रशिक्षीत व्यक्तींचे सहकार्य घेतले जाणार आहे. 13 प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे. तपासलेल्या नोंदींची माहिती संकेतस्थळावर टाकून न्या.शिंदे समितीलाही पाठवली जाणार आहे.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र (Maratha-Kunbi, Kunbi-Maratha Caste Certificate) देण्यासाठी 13 विविध प्रकारच कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नं. 01 हक्क नोंद पत्रक, नमुना नं. 02 हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेखांचा समावेश आहे.

जन्म-मृत्यू नोंदी रजिस्टर (गाव नमुना 14), शैक्षणिक अभिलेख्यामध्ये प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, रेल्वे पोलीस विभागाकडील गुन्ह्याबाबतच्या नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडील माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता करण्यात आलेली कागदपत्रे, जिल्हा वक्फ अधिकारी यांचेकडील मुंतखब, 1967 पूर्वीचे अधिकारी-कर्मचार्‍यांचे सेवापुस्तक, महानगरपालिका आणि नगरपालिकेकडील शेतवार तक्ता वसूल व आमदनी नोंदवही आणि सैन्य भरती कार्यालयाकडील सैन्य भरतीच्यावेळी घेतलेल्या नोंदी तपासण्यात येतील.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकडील अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही आणि आस्थापना कागदपत्रे, तर कारागृह अधीक्षकांकडील कच्चे आणि गुन्हे सिद्ध झालेल्या कैद्यांच्या नोंदवह्या, पोलीस विभागाकडील गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर रजिस्टर तपासण्यात येईल.
सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडील खरेदीखत नोंदणी केलेले रजिस्टर, डे-बुक, करार खत, साठेखत, इसारा पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र व इतर दस्त तपासण्यात येतील. भूमी अभिलेख विभागाकडील पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हीजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणी पत्रक, नमुना-33, नमुना-34 आणि टिपण बुक तपासण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Local ad 1