आता काळजी घ्याल तरच पुढे एकमेकांना सावरू : जिल्हाधिकारी
नांदेड : कोरोनाच्या धोक्यापासून सावरत असतांना जगभर नवीन धोकादायक ओमीक्रोम (Omicron) नावाचा कोरोना विषाणू युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रिया, युके व इतर युरोपीयन देशात (Europe, Africa, Austria, UK and other European countries) थैमान घालत आहे. त्याचा झपाट्याने होणारा प्रसार यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोनापेक्षा हा नवीन विषाणू पाचशेपट अधिक घातक असल्याने आता सर्वच नागरिकांनी लसीकरण आणि मास्कसह दैनंदिन जीवनात पंचसुत्री वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आता काळजी घेऊ तरच एकमेंकांना सावरू या स्पष्ट शब्दात नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हावासियांना आवाहन केले आहे. (Only if we take care now, we will save each other: Collector Dr. Vipin Itankar)
समाजकल्याण अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये ठेवलेले ‘ते’ बंडल निघाले लाखाचे
जिल्ह्यात लसीकरणाबाबत सर्वच स्तरातून एक उदासीनता दिसून येत आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रांवर लसीकरणासाठी सर्व सुविधा तत्पर ठेवलेली आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहनही केले जात आहे. असे असूनही नांदेड जिल्ह्यातील असंख्य लोक आपला बेजबाबदारपणा सोडयला तयार नाहीत. लोकांनी येऊ घातलेला कोरोनाचा विषाणू लक्षात घेता आपल्या वर्तणातून आपण जबाबदार नागरीक असल्याचे कर्तव्य पार पाडावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. (Only if we take care now, we will save each other: Collector Dr. Vipin Itankar)
जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी कारण नसतांना वाढणारी गर्दी व लोकांची वर्दळ ही चिंतेची बाब आहे. यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर स्पष्ट आदेश निर्गमीत केले असून विविध सेवा प्रदाते व आस्थापना, यंत्रणा यांच्यावर आदेशान्वये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यात कसूर दिसल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारू असे त्यांनी सांगितले. (Only if we take care now, we will save each other: Collector Dr. Vipin Itankar)
किरकोळ व घाऊक दुकानदार, मॉल, मोंढा येथे विक्रेते
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:च्या दुकानातील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
पेट्रोल पंप
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व पंपावरील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
हॉटेल्स आणि परमीट रूम
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे, हॉटेल्स व परमीट रुम मधील कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री करावी. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (शासकीय व खाजगी)
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व चालक-वाहक, इतर कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
सेतू सुविधा केंद्र
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
हातगाडीवाले, फळे, भाजीपाला, मांस विक्रेते, आठवडी बाजारातील सर्व विक्रेते
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
हमाल व माथाडी कामगार
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व कर्मचारी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था, अभ्यागत सर्व कार्यालय प्रमुखांनी स्वत:चे व अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित अभ्यागतांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. तसेच कार्यालयातील सर्वांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आस्थापनाकडे असल्याची खात्री करुन त्याची लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे. (Only if we take care now, we will save each other: Collector Dr. Vipin Itankar)
सर्व शाळा व महाविद्यालय सर्व खाजगी शिकवणी वर्ग
सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वत:चे व अधिनस्त सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी तसेच संबंधित 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे. तसेच कार्यालयातील सर्वांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आस्थापनाकडे असल्याची खात्री करुन त्याची लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.
गॅस पुरवठादार, रास्त दुकानदार व ग्राहक
सर्व सेवा प्रदाते यांनी स्वत:चे व अधिनस्त कर्मचारी तसेच त्यांच्या ग्राहकांचे कोविड-19 लसीकरण असल्याची खात्री केली पाहिजे. कोविड अनुरूप मास्क वापरण्यासह जी पंचसूत्री दिली आहे त्या शिस्तीचे पालन व अनुकरण करण्यास आग्रह धरला पाहिजे.
सर्व जबाबदार यंत्रणांनी फिरते तपासणी / पडताळणी पथक तयार करुन कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन करणारे सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती यांची आकस्मिक तपासणी / पडताळणी करुन त्यांना शास्ती करावी. तसेच सेवा प्रदाते व व्यक्ती यांचे कोविड लसीकरण असल्याचे सुद्धा खात्री करावी. सर्व सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करताना आवश्यक असलेल्या वस्तू हॅड सॅनिटायजर, साबण, पाणी व तापमापक आदी गोष्टी उपलब्ध करुन घ्याव्यात.
अन्यथा असे असेल दंडाचे स्वरुप
कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस प्रतीप्रसंगी 500 रुपये इतका दंड राहील. सेवा प्रदाते / संस्था यांनी आपले अभ्यागत व ग्राहक इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीवर दंड याव्यतीरिक्त अशा संस्थाना/आस्थापनांना 10 हजार रुपये दंड करण्यात यावा. एखाद्या संस्थेने तसेच सदर संस्था वारंवार या कर्तव्यात कसूर करत असेल तर ती संस्था / आस्थापना कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत किमान दोन दिवस बंद करण्याबाबत आदेशीत केले आहे.
सेवा प्रदाते / संस्था यांनी कोविड अनुरूप वर्तन करणे अपेक्षित आहे. यामध्ये कसूर आढळल्यास अशा संस्था/आस्थापनांना 50 हजार रुपये इतका दंड करण्यात यावा. एखाद्या संस्थेने तसेच सदर संस्था वारंवार या कर्तव्यात कसूर करत असेल तर ती संस्था / आस्थापना कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत किमान बंद करण्याबाबत आदेशीत केले आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (चारचाकी वाहन, बस इत्यादी) यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड व सेवा पुरवठादार यांना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल.