पुणे : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना (Ration card) ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Siddha) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, शिधा वितरणाचे ढासळलेले नियोजन आणि शासकीय कर्मचारी संपामुळे (Government employees strike) गुढीपाडव्यानंतरच आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Only after Gudi Padva will get the Anandacha Siddha)
दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ योजना राबविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी नियोजनाच्या अभावामुळे अनेक भागात दिवाळी संपल्यानंतर ‘आनंदाचा शिधा’ जनतेपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी झालेल्या चुका सुधारून आतातारी वेळेच्या आता शिधा संच लाभार्थ्यांना मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील पुरवठादार हा पुर्वीचाच नेमण्यात आला आहे. त्याप्रमाणेच धान्य वेळेत पोहोचत नसल्याची बाब समोर आली आहे. (Only after Gudi Padva will get the Anandacha Siddha)
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच लाख 61 हजार तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात तीन लाख 17 हजार लाभार्थी आहेत. शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल मिळणार आहे. (Only after Gudi Padva will get the Anandacha Siddha)