(Online job fair) औरंगाबादमध्ये आजपासून ऑनलाईन रोजगार मेळावा

औरंगाबाद : अभियांत्रिकी, वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतील पदवीधर, डिप्लोमा, आय.टी.आय, बारावी तसेच दहावी पास व नापास उमेदवारांसाठी वरीलपदे अधिसूचित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत., अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एन. एन. सूर्यवंशी यांनी दिली. Online job fair in Aurangabad from today

शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद या कार्यालयामार्फत 25 ते 30 जूनपर्यंत पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. Online job fair in Aurangabad from today

रोजगार विभागाचे संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in यावर नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात स्पेशालिटी पॉलिफिल्म्स (I) प्रा.लि., स्कायबायोटेक लाईफ सायन्सेस प्रा.लि., एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्स प्रा.लि., फोरेस इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड, इन्फोगीर्ड इन्फॉर्मटीक्स प्रा.लि., रत्नप्रभा मोटर्स आणि धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद तसेच इतर नामांकित उद्योजकांनी 175 पेक्षा जास्त रिक्तपदे ऑनलाईन पध्दतीने अधिसूचित केलेली आहेत. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.


असा करा अर्ज ऑनलाईन पध्दतीने मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमूद रिक्तपदांना 30 जून 2021 पर्यंत एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑलनाईन अप्लाय करावे. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही त्यांनी एम्प्लॉयमेण्ट टॅब वरील जॉब सीकर हा पर्याय निवडून नोंदणी करावी व त्यानंतर पात्रतेनुसार अप्लाय करावे.


अडचण आल्यास येथे करा संपर्क संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. Online job fair in Aurangabad from today

Local ad 1