पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत (Department of Social Justice and Special Assistance) अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (Scheduled Caste students) देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Post Matric Scholarship) योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज (Scholarship online application process) करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https:// mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware) यांनी केले आहे. (Online application process of scholarship extended till 30th May)
राज्यातील दहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोणती मिळाली जबाबदारी
ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार करुन अर्ज रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील. (Online application process of scholarship extended till 30th May)