पोलिस पाटील पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, परीक्षा फी किती आहे? Online Application for Police Patil Post

लिस पाटील (Police Patil Bharti 2024) यांचे 829 पदे रिक्त आहे. ती भरली जात असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ( Online Application for Police Patil Post)

Online Application for Police Patil Post । नांदेड : जिल्ह्यातील नांदेड, भोकर, कंधार, हदगाव, देगलूर, धर्माबाद, बिलोली, किनवट उपविभागातंर्गत पोलिस पाटील (Police Patil Bharti 2024) यांचे 829 पदे रिक्त आहे. ती भरली जात असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ( Online Application for Police Patil Post)

 

Police Patil Bharti 2024

 

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयातंर्गत येणाऱ्या गांवामध्ये पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. (Nanded Police Patil Recruitment 2024) ते भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरली जात आहेत. त्याची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 जानेवारी ते 8 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. (Nanded Police Patil bharti)

परीक्षा शुल्क किती ? How much is the exam fee?

खुला प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 700 रुपये परीक्षा शुल्क अकारले जाणार आहे. तर परीक्षा ही 14 जानेवारी रोजी होणार आहे.

येथे करा अर्ज
http://nanded.applygov.net/Apply-Now

 

कोण करुन शकतो अर्ज – Who can apply?

  • एस.एस.सी (10 वी) उत्तीर्ण उमेदवार – SSC (10th) passed candidates
  • अर्जदार ज्या गावासाठी अर्ज करणार आहे, त्याच गावातील उमेदवार असावा
  • वय 25 ते 45 वयोगटातील असावे – Age should be between 25 to 45 years

 

 

पोलिस पाटील पद कधी अस्तित्वात आले?, त्यांचे कर्तव्य काय आहेत? , मानधन किती मिळते?, निवड कशी होते?, अशी अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाली असतील. त्यामुळे mhtimes.in च्या माध्यमातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अपेक्षा आहे, तुम्हांला आम्ही देत असलेली माहिती उपयोगाला येईल. (When was the post of Police Patil approved?)

पोलिस पाटील पदाला मान्यता कधी मिळाली ? When was the post of Police Patil approved?

राज्य शासनाच्या महसूल आणि पोलिस विभागाला वेळोवेळी मदतीसाठी प्रत्येक गावात एक विश्वासू व्यक्ती हवा होता. त्यामुळेच 17 डिसेंबर 1967 (Maharashtra Village Police Act, 1967) रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.

कोणत्या नियमानुसार पाटील पदाची निर्मिती ?

ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव पातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी पोलिस पाटलांना शेतसारा वसूल करणे, सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करणे, गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पोलिस पाटलांवर सोपविण्यात आले.

 

ब्रिटिश काळातील परंपरा रद्द

इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेखीचे काम पाटील यांच्याकडेच होते. ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 (Bombay Village Police Act 1867) अंमलात आणला गेला, त्या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद परंपरेने पुढे आले. मात्र, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागत पदे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1962 पासून रद्द करण्यात आली.

 

पोलिस पाटील कोणाच्या आदेशाने काम करतात ? Police Patil works under whose order?

17 डिसेंबर 1967 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रत्येक महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 (Maharashtra Village Police Act, 1967) अधिनियम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये काम करतात.

 

पोलिस पाटलांची काय आहेत कर्तव्य ? What are the duties of Police Patil?

तालुका कार्यकारी दंडाधिकारी गावातील जी माहिती मागवतील ती पुरवणे, गावातील गुन्ह्यांचे प्रमाण व समाज स्वास्थाची माहिती कळवणे, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना वेळोवळी देणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे. गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.

Local ad 1