online application for Police Patil post । पोलिस पाटील पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
online application for Police Patil post ।नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या 839 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
online application for Police Patil post ।नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या 839 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://nanded.applygov.net या अधिकृत संतेकस्थावर गेल्यानंतर त्याठिकाणच्या पोलिस पाटील भरती 2024 (Police Patil Bharti 2024) वर क्लिक करा, त्याठिकाणी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या समोर सर्वात वर पद व आरक्षण येईल. त्यात आवश्यक माहिती भरा. एकूण सात टप्पे भरायची आहेत. त्यानंतरच तुमचा अर्ज भरला जाईल. (Learn easy method of online application for Police Patil post)
पहिला टप्पा
जिल्हाधिकारी कार्यलय नांदेड यांच्या http://nanded.applygov.net या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यावर पोलीस पाटील भरती 2024 (Police Patil Bharti 2024 यावर क्लिक करा. पेज ओपन झाल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पर्याय येईल. त्याठिकाणी सर्वात आधी पद व आरक्षण येईल, त्याठिकाणी आवश्यक माहिती भरा. (nanded police patil bharti 2024)
दुसरी टप्पा
उमेदवाराने आपले संपूर्ण नाव, आधार क्रमांक टाका त्यानंतर पिन कोडसह संपूर्ण पत्ता भरा.
तिसरा टप्पा
उमेदवारांनी आपली शैक्षणिक अर्हतेची माहिती टाकून aad Education ला दाबावे व पुढील शैक्षणिक माहिती भरावी.
चौथा टप्पा
इतर माहिती भरा, त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नानांची उत्तरे हो किंवा नाही यावर क्लिक करा
पाचवा टप्पा
फोटो आणि सही अपलोड करा
सहावा टप्पा
अर्ज पूर्ण भरल्यानंतर परिक्षा शुल्क भराण्यासाठी परिक्षा शुल्क भरा या पर्यायावर जा, त्याठिकाणी चलन अपलोड करा.
सातवा टप्पा
परीक्षा शुल्क भरल्याची पावती मिळवा.