Ration Card Online । शिधापत्रिका आता मिळवा ऑनलाइन

Ration Card Online । पुरवठा विभागात शिधापत्रिका मिळविण्यासाठी आता चकरा मारण्याची गरज नाही. कारण राज्य शासनाने ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून दिली आहे. ही शिधापत्रिका संबंधित लाभार्थी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येते. यामध्ये अन्न सुरक्षा योजना, राज्य योजनेचे शिधापत्रिकधारकाचाही समावेश आहे. (Online Application for new Ration Card)

 

अर्ज करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202312201650378506.pdf

 

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या (national food security scheme 2013) लाभार्थ्यांना क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. यामध्ये शिधापत्रिकांवर कोणत्या योजनेत समावेश होतो, याची नोंद केली जाता आहे.

 

JN1 variant। पुण्यात कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा शिरकाव

अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्राधान्य कुटुंब योजना ( PHH), राज्य योजनेंतर्गत (APL), राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने व्यतिरिक्त (NPH) असे नमूद करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक हे गरीब व गरजू कुटुंबातील असतात. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना या ऑनलाइन सुविधा निशुल्क आहे.

 

अर्जदाराने ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध होणार आहे.

 

 

Local ad 1